‘जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : भारताने काल १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. तसेच दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशवासियांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील युद्धात, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना कोणतेही शिथिलता न आणण्याचे आवाहन केले. कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे त्यांनी सांगितले.
‘कितीही चांगले चिलखत, कितीही आधुनिक चिलखत असले तरी, चिलखतीपासून संरक्षणाची संपूर्ण हमी आहे तरी युद्ध चालू असतानाही शस्त्रे फेकली जात नाहीत. मी विनंती करतो की आपण आपले सण अत्यंत काळजीपूर्वक साजरे केले पाहिजेत. देशाला मोठी ध्येये कशी ठरवायची आणि ती कशी साध्य करायची हे माहित आहे. पण, यासाठी आपण सतत सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण निष्काळजी राहू नये’ असे ते म्हणाले.
आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. लसीकरणाने १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे.पण अद्यापही लस न घेतलेल्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या संबोधनामध्ये सांगितले.
देशात कोरोनाचा प्रवेश झाला त्यावेळी मोदींनी टाळ्या-थाळ्या वाजविण्याचा सल्ला दिला होता. तसेच दिवे लावण्यास देखील सांगितले होते. पण, त्यावरून अनेकांनी मोदींवर टीका केली. आता लसीकरणात भारताने रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर मोदींनी टीकाकारांना उत्तर दिले आहे. ‘देशाच्या या लढाईत जनतेच्या सहभाला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स बनवलं. लोकांनी एकजूट असण्याला ऊर्जा देण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले, त्यावेळी काही लोकांनी यामुळे महासाथ निघून जाईल का असा प्रश्न उपस्थित केला होता. सर्वांना त्यात देशाची एकता दिसली, सामूहिक शक्ती दिसली. या ताकदीनं कोरोना लसीकरणात १०० कोटींपर्यंत पोहोचवलं आहे’ असे मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- ‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा!’, राऊतांचा शायरीतून सोमय्यांवर वार
- ‘राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार असेल तर पोलीस यंत्रणा दरोडेखोरांना कसं पकडणार?’