‘जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत एकाही घराला हात लावू देणार नाही’

टीम महारष्ट्र देशा – दौंडमधल्या रेल्वे परिसरातल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत एकाही घराला हात लावू देणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या दौंड येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत बोलत होत्या.

यावेळी सुळे म्हणाल्या की, रोजगार हमी योजनेत काम केले तरी महिन्याला जवळपास ८ हजार रुपये मिळणार पण हे सरकार ६ हजार देत आहे. पण जरा आणखी शुन्य यात वाढवले असते तर बरे झाले असते.

सरकार म्हणतंय की हमीभाव दिला पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाही, हे सरकार मांडतं एक आणि करतं एक. हा ‘जुमलो’ का बजेट आहे. दौंडमधल्या रेल्वे परिसरातल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत एकाही घराला हात लावू देणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.Loading…
Loading...