fbpx

जोपर्यंत भाजप आपल्याला पक्षातून काढत नाही, तोपर्यंत इथंच राहणार : गावित

जळगाव : भाजपमध्ये गेलेले माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह घर वापसी करणार या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, या वृत्ताचा गावित यांनी इन्कार केलाय. भाजपमध्ये आपण सुखी आहोत. जोपर्यंत भाजप आपल्याला पक्षातून काढत नाही, तोपर्यंत इथंच आहे अशी प्रतिक्रिया देत घर वापसीचे वृत्त फेटाळलेय.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात नंदुरबार या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत गेलेल्या विजयकुमार गावित हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीकडून उतरतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.