मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्य नाही

athawale-ramdas-

टीम महाराष्ट्र देशा : ‘जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्य नाही. ची पाहणी झालेली असून पाठपुरावा चालू आहे. इंदू मिलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुस्लिम समाजाला बळीचा बकरा केले जात आहे, म्हणून या देशाला कायदा समजून घेण्याची आवश्यकता आहे,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय समाज कल्याण मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपला मनसेचा फायदा नाही. राज ठाकरे पॉलिटिकली शून्य आहेत. राज ठाकरेंबरोबर भाजप असेल तर मी विरोधात जाईन. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नाइट लाइफ संकल्पनेमुळे गुन्हेगारीला आमंत्रण मिळणार आहे. महिलांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. म्हणून नाइट लाइफला विरोध आमचा आहे.

दरम्यान, आढावा बैठ्कीमध्ये त्यांनी ऍट्रॉसिटी, जनधन, आयुष्यमान भारत योजना यांसह विविध शासकीय योजनांची माहिती घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेला 2022 मध्ये 95 वर्षे पूर्ण होत असून, गरिबांना शौचालय असायला हवे, गॅस सिलिंडर असायला पाहिजे. यासाठी शासन विविध उपाय योजना करीत आहे. त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवा, असे त्यांनी या वेळी सांगितले.