राज्यात भाजप सत्तेत नसल्यामुळे त्यांची आगपाखड होत आहे- शंकरराव गडाख

shankarrao gadhakh

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. भारतीय जनता पार्टीचे १०५ आमदार असून पण ते विरोधात बसले. आता भाजप सत्तेत नसल्यामुळे त्यांची आगपाखड होत आहे. आमच्याशिवाय राज्यात कोणाला सत्ता जमणारच नाही, अशी भाजपची भूमिका तयार झाली होती. त्यांच्या या भूमिकेला तडे जाताना दिसत आहेत. त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो आणि राज्यात सरकार चालवू लागलो. त्यामुळे विरोधकांचा संयम सुटत चालला अजून छोटी छोटी प्रकरणे फार मोठी भासवण्याचा प्रयत्न होतोय अशी टीका मंत्री शंकरराव गडाख यांनी कंगना व सुशांतसिंह प्रकरणावर बोलताना राज्यातील भाजप नेत्यांवर केली.

ना.गडाख अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या कठीण परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला सहकार्य करणे गरजेचे होते. पण तसं होताना दिसत नाही उलट विरोधक ह्या कठीण काळात राजकारण करत आहे. असे ना. गडाख म्हणाले.

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी योग्य तपास करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यात राजकारण झाले. सुशांतसिंह प्रकरणाबाबतची चर्चा ही आता दुसरीकडे भरकटली आहे. तसेच कृषी विधेयकाला देशभर सर्वत्र विरोध होत आहे. म्हणूनच आज भारत बंदची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे, असे ना.गडाख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-