कोरोनाचा परिणाम, आता इस्रायल देशानेही भारतात जाण्यास घातली बंदी

airport

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे इस्रायलने आपल्या नागरिकांना भारतासह सात देशांचा प्रवास करण्यास मज्जाव केला आहे. आज ३ मे पासून हे निर्बंध लागू करण्यात आलेत. यासंबंधीचे निर्बंध १६ मेपर्यंत कायम राहतील, असे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालय आणि आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली आहे. त्यानुसार इस्रायलच्या नागरिकांना भारत, युक्रेन, ब्राझील, इथोपिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको आणि तुर्कीचा प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण गैर इस्रायल नागरिकांना या देशांचा प्रवास करण्याची मुभा असेल. मात्र, यासाठी संबंधित व्यक्तीकडे या देशांमध्ये राहण्याची कायमस्वरूपी योजना असणे गरजेचे आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.

सरकारने आरोग्य व अंतर्गत प्रकरणाच्या मंत्र्यांना अपील समितीचे नेतृत्व करण्यासाठी आणि विशेष प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. निर्बंध लादलेल्या ७ देशांमधून परतणाऱ्या व्यक्तींना दोन आठवड्यांचे क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आले आहे. दोन वेळेस अहवालात निगेटिव्ह आढळणाऱ्यांना देखील १० दिवसांचे क्वारंटाईन बंधनकारक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या