यामुळे भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट नाही खेळत; खरे कारण आले समोर

मुंबई : आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडुंना स्थान देण्यात आले. मात्र भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला या संघातुन वगळल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

भुवनेश्वर कुमार आणि जसमीत बुमराह हे भारताची गोलंदाजी आघाडी म्हणून ओळखली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून भुवी दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. मात्र आयपीएल स्पर्धेपुर्वी फिटनेस सिद्ध केल्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र या दौऱ्यात त्याला डावलण्यात आले. मात्र खुद्द भुवीला त्याच्या फिटनेस बद्दल शंका होती. पाच दिवसाच्या सामन्यात तो खेळु इच्छीत नव्हता अशी माहिती समोर आली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भुवीने हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत भुवीने त्याला मर्यादीत क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे तो कसोटी खेळण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे. २०१३ साली भारताकडून पदार्पण करणाऱ्या भुवीने भारताकडून २१ कसोटी सामने खेळताना २६.०९ च्या सरासरीने ६३ बळी मिळवले आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP