आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान तसेच इतरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील आपला निकाल राखून ठेवला आहे. येत्या 20 ऑक्टोबरला न्यायालय आपला निकाल देईल. दरम्यान, सुनावणी पूर्ण झालेली असली तरी आर्यन खानचा मुक्काम सध्यातरी तुरुंगातच असणार आहे.

मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला तो एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.NCB चे वकिल अनिल सिंह यांनी सांगितलं की, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील 6 दिवस त्याला तुरुंगात राहावं लागणार आहे.

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी दरम्यान एनसीबीने कोर्टाला सांगितले की, त्यांच्याजवळ असे पुरावे आहेत ज्यावरुन असं कळतं की, आर्यन बऱ्याच वर्षांपासून प्रतिबंधित ड्रग्सचं सेवन करीत होता. इतकच नाही तर त्याने दुसऱ्या देशांमध्ये जाऊनही नशा केला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकार शाहरूख आणि आर्यनच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या