आर्या आंबेकरचा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

आर्या आंबेकरचा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

आर्या आंबेकर

मुंबई : १२ वर्षापुर्वी झी मराठीवर सारेगम लिटील चॅम्प या गायनाच्या कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. याच कार्यक्रमातील पंचरत्नापैकी एक आर्या आंबेकर. आर्याने गायनाने त्या कार्यक्रमात जे वेड लावले ते आजही कायम आहे. आजही तिने गायलेल्या गाण्याना अनेकांकडून पंसती मिळत आहे. नुकताच आर्याने तिचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्याने शेअर केलेल्या य व्हिडिओ मध्ये तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस घातला असल्याचे दिसत आहे. यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तिच्या या फोटोवर सध्या लाईक आणि कमेंट चा वर्षाव होत आहे. तिचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

आर्याने २०१७ मध्ये सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात तिची तन्वीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलुन धरली. गायनासोबत अभिनयातही अर्या आंबेकरने वेगळा ठसा उमटवला. झी मराठी वरील सध्या सुरु असलेल्या ‘माझा होशील ना’ या कार्यक्रमाचे शिर्षक गीत गायले आहे. तर सद्या आर्या झी मराठीवरील सारेगम लिटील चॅम्प कार्यक्रमात ती ज्युरीची भूमिकेत दिसत आहे. या शोसाठीच तिने हा लुक केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या