Share

Arvind Sawant | चिन्ह गोठविलं, आमचं रक्त पेटवलं; अरविंद सावंत आक्रमक

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल रात्री आपला निर्णय जाहीर करत शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. अंतिम निर्णय येईपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यासर्व घडामोडीवरून सर्व घडामोडींवर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत. तसेच शिवसेनेतून आक्रमक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याबाबत आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत?

याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाचं अस्थित्व काही नाही. निवडणूक आयोगानं चिन्ह गोठविलं. हा मुद्दा गैर आहे. जे अर्ज करतात ते अंधेरीतील निवडणूक लढविणार आहेत का? भाजप निवडणूक लढविणार नाही. पण, हा भाजपचा अजेंडा आहे. अरविंद सावंत यांनी मनातली खदखद व्यक्त करताना सांगितलं की, चिन्ह गोठविलं. मनातली जागा नाही गोठवली. चिन्ह गोठविलं पण, रक्त पेटविलं आमचं. या सगळ्यानं आम्ही घाबरणार नाही, असं ते म्हणाले.

पुढे या पद्धतीनं भाजपचे नेते वागणूक देतील, असं वाटत होतं. देशाचे गृहमंत्री म्हणतात खरी शिवसेना शिंदे गटाची आहे. म्हणजे हे न्यायाधीश झाले आहेत का?. अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली. तसेच भाजपचे प्रवक्ते म्हणतात. पाच वर्षे काही होणार नाही. सर्व जनतेला कळतंय, हे महत्त्वाचं आहे. शिंदे गटातील लोकं हे शिवसेनेच्या पाठीत सुरा खुपसून गेलेत. हे कठपुतळी बाहुले भाजपच्या इशाऱ्यावर नाचताहेत, असा घणाघात अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर केला.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल रात्री आपला निर्णय जाहीर करत शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. अंतिम निर्णय येईपर्यंत ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now