Share

Aravind Sawant | “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची कुठे आहेत?”; अरविंद सावंतांचा फडणवीसांना खोचक सवाल

(Aravind Sawant) मुंबई : सत्ताधारी पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे. अशातच ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. पाऊस किती पडावा, ते महापालिका ठरवत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार अरविंद सावंत यांनी घेतला आहे.

ते म्हणाले, “पुण्यात पडलेल्या पावसावर उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं? ‘पाऊस काय आमच्या कंट्रोलमध्ये असतो का?’ मग मुंबईत पाऊस कुणाच्या कंट्रोलमध्ये असतो? तेव्हा तमाशा करता का? “मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये नाचणारी नाची कुठे आहेत? ते सध्या मी शोधतोय. मुंबईतल्या खड्ड्यात नाचणारी नाची पुण्यात कशी गेली नाहीत? ती नागपूरला का नाचायला गेली नाहीत? असा सवाल करत त्यांनी फडणवीसांना टोला लगावलाय. पावसामुळे निर्माण होणाऱ्या अशा मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केलं जात आहे”, असं म्हणत अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना अरविद सावंत यांनी भास्कर जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत देखील भाष्य केलंय. “आमदार भास्कर जाधव यांचं संरक्षण काढलं आणि तासाभरात त्यांच्या घरावर हल्ला झाला. हे कशाचं द्योतक आहे? ही काय लोकशाही आहे का? असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेत. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यानं फार काही फरक पडत नाही. मुळात लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं विचारांचं आदान-प्रदान आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या अधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरु असल्याचा आरोप सावंतांनी यावेळी केलाय. त्याचबरोबर महाराष्ट्रातही त्याचं अनुकरण होत असल्याचं सावंत म्हणालेत.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

सोमवारी पुण्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं होत. यासंदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता त्यावर बोलताना त्यांनी पाऊस किती पडावा, ते महापालिका ठरवत नाही, असं उत्तर दिलं. “पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही. पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पुण्यात पडलेल्या पावसाने मागील १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत.

महत्वाच्या बातम्या :

(Aravind Sawant) मुंबई : सत्ताधारी पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या मालिकांचं सत्र सुरूच आहे. अशातच ठाकरे गटातील खासदार अरविंद …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics