‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बिणीनं भाजपाला शोधावं लागलं असतं’

modi thackeray

मुंबई : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ पंढरीत फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली.

पंढरपूरच्या या निकालावर भाष्य करताना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. जे स्वत: कुबड्यांवर आहेत आणि ज्यांचे पहिले पाऊलचं कुबड्यांशिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकात नाही असा टोला शेलारांनी नाव न घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला होता.

आशिष शेलार यांच्या टीकेला शिवसेना खासदार शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या कुबड्यावर होता. आमची कुबडी आणि आमची शिडी घेऊन भाजपा महाराष्ट्रात वाढली. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बिणीनं भाजपाला शोधावं लागलं असतं. संघाच्या शाखेवर २ माणसं उभी असायची. राज्यात भाजपाचा विस्तार शिवसेनेमुळे झाला. ही शिडी भाजपानं विसरणं म्हणजेच कृतघ्नपणा आहे असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या