Share

Arvind Sawant | मुंबई महापालिकेच्या कॅग चौकशीवरून अरविंद सावंतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा,म्हणाले…

Arvind Sawant | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. कोरोना (Corona[) संसर्गाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं, राज्य सरकारने म्हटलं आहे. त्या काळात 76 कामांमध्ये सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला. या आरोपांनंतर कॅगकडून मुंबई महापालिकेची चौकशी केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले अरविंद सावंत (Arvind Sawant)

मुंबई महापालिकेसोबत नागपूर, ठाणे, नाशिक आणि पुणे महानगरपालिकेचीही कॅगकडून चौकशी करावी, अशी मागणी मी करतो. कारण ठाणे महानगरपालिकेची तिजोरी तर रसातळाला गेली आहे. या सर्व महापालिकांची कॅगकडून चौकशी केली तरच तुम्ही न्यायिक भूमिका घेतली, असा संदेश जाईल.

नाहीतर ही पुन्हा एकदा तुमची राजकीय भूमिका ठरेल. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कॅगने संबंधित सर्व महापालिकांची चौकशी केली पाहिजे,असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

अरविंद सवांत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात एकनाथ शिंदे हेच नगरविकास मंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एकनाथ शिंदेच नगरविकास मंत्री होते आणि आताही नगरविकास खातं त्यांच्याकडेच आहे. या सगळ्या कारभाराला एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) जबाबदार आहेत. त्याचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या :

Arvind Sawant | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. कोरोना (Corona[) संसर्गाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now