Share

Arvind Sawant | “वाईट या गोष्टीचं वाटत की…” अरविंद सावंत यांचा गजानन कीर्तीकर यांच्यावर घणाघात

Arvind Sawant | मुंबई : गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) हे ठाकरे गटातच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यादरम्यान, चंद्रकांत खैरेंनी निवडणूक लढवली, तेव्हा आम्ही त्यांच्या प्रचारात अग्रणी होतो. आम्ही कुठेच आमदार वगैरे नाही झालो. किर्तीकर नगरसेवक झाले, आमदार झाले, मंत्री झाले. लोकाधिकारच्या चळवळीतही सुरुवातीपासून होतो. माझा भाऊ किर्तीकरांसोबत काम करत होता. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की चार वेळा आमदारपद, दोनदा खासदारपद मिळालं. नंतर तुम्ही राज्यमंत्रीही झाला होता. सगळं कसं एका क्षणात विसरलात?, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारला आहे.

याबाबत बोलत असताना, शिवसेनेत वरीष्ठ-कनिष्ठ असा वाद कधीच नव्हता. शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश वंदनीय असतो. आता ते ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले आहेत, ते तर किती ज्युनिअर- ज्युनिअर आहेत. मग त्यांचं नेतृत्व स्वीकारणाऱ्यांना असं म्हणण्याचा कुठला अधिकार आहे? एक मिंधा दुसऱ्या मिध्याला मिळाला. आयुष्याचा सूर्य पश्चिमेला मावळत असताना आपल्याला कळायला पाहिजे की मावळताना तरी किमान स्वाभिमानाने जावं. आम्हाला सगळ्यांना वाटतं की भगवा घेऊनच वर जावं, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Arvind Sawant | मुंबई : गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now