Share

Arvind Sawant | “मग तेव्हा तमाशा का करता?”; देवेंद्र फडणीसांच्या ‘त्या’ वक्तव्याला अरविंद सांवतांनी दिले प्रत्युत्तर

Arvind Sawant | पुणे : सोमवारी पुणे (Pune Rain) शहरामध्येही खूप जोरात पाऊस झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काहीवेळातच पावसाने चांगलाच जोर धरला. पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. रसत्यांवरील पाण्यामुळे एसट्या देखील ठप्प झाल्या. ज्यामुळे अनेक प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला आहे. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपवर (BJP) जोरदार टिका केली होती. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पाऊस किती पडावा हे महानगपालिका ठरवत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी फडणीसांवर हल्ला केला आहे.

काय म्हणाले अरविंद सांवत (Arvind Sawant)

पाऊस किती पडावा हे महानगपालिका ठरवत मग मुंबईत पाऊस कुणाच्या कंट्रोलमध्ये असतो?, असा खोचक सवाल करत अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत पाऊस पडतो तेव्हा तमाशा का करता? ती नाची कुठे आहेत, ते सध्या मी शोधतोय. मुंबईतल्या (Mumbai) खड्ड्यात नाचणारी नाची पुण्यात कशी गेली नाहीत?, ती नागपूरला का नाचायला गेली नाहीत? हा खरा प्रश्न आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या अशा मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले,  आमदार भास्कर जाधव याचं संरक्षण काढलं आणि तासाभरात त्यांच्या घरावर हल्ला झाला. हे कशाचं द्योतक आहे? ही काय लोकशाही आहे का? त्याचा जितका निषेध करा, तितका थोडा आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी त्यानं फार काही फरक पडत नाही. मुळात लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं विचारांचं आदान-प्रदान आहे. व्यक्तीस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या अधिकारांवर घाव घालण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या :

Arvind Sawant | पुणे : सोमवारी पुणे (Pune Rain) शहरामध्येही खूप जोरात पाऊस झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरूवात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now