सर्व विरोधीपक्षांशी आघाडी करू मात्र आपसोबत आघाडी नाही – काँग्रेस

नवी दिल्ली : एकीकडे भाजपाला रोखण्यासाठी देशभरातील विरोधीपक्षांचे एकत्र येत मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहे. या सर्वांमध्ये काँग्रेस केंद्रस्थानी असून, येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवणार आहे. मात्र जरी असे असले तरी काँग्रेस आपसोबत आघाडी करणार नाहीये. सर्व विरोधी पक्षांना काँग्रेससोबत आघाडी करण्याचा पर्याय खुला असेल मात्र जरी असे असले, तरी आम्ही आपसोबत कधीच आघाडी करणार नसल्याचं दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माकन यांनी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मोदी नावाचा राक्षस उभा करण्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा मोठा हात असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, ‘अण्णांच्या आंदोलनामध्ये किरण बेदी, बाबा रामदेव, जनरल व्ही, के. सिंह यांच्यासोबत आरएसएस आणि भाजपाच्या पाठबळाच्या जोरावर मोदी नावाच्या राक्षसाला जर कुणी उभे केले असेल तर त्याचे नाव अरविंद केजरीवाल आहे.’

आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करू शकतो. पण ज्यांनी मोदींसारखा राक्षस उभा केला, असे दिल्ली कार्यकर्त्यांचे मत आहे. अशा लोकांसोबत कशी काय आघाडी होऊ शकते. अण्णांच्या आंदोलनामधून केवळ आणि केवळ काँग्रेसची बदनामी करण्यात आली. या आंदोलनात बी. एस. येडीयुरप्पा, प्रेमकुमार धुमल, प्रकाशसिंह बादल यांच्यावर कोणतीही टीका करण्यात आली नाही. मात्र काँग्रेसवर सातत्याने टीका करून पक्षाला नुकसान पोहोचवले गेले.त्यामुळे आम्ही आपसोबत आघाडी करणार नसल्याचं त्यांनी सांगितले.

Loading...