आपला ‘जोर का झटका’ अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; भाजप

तब्बल २० आमदारांचे भवितव्य धोक्यात

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीला निवडणूक आयोगाने जोर का झटका देत २० आमदार अपात्र ठरवण्याची शिफारस  राष्ट्रपतींकडे केली आहे. त्यामुळे आप मध्ये राजकीय दंगल निर्माण झाली आहे.

दिल्लीतील आम आदमी पार्टीला (आप) निवडणूक आयोगाने शुक्रवारी हादरा दिला. लाभाच्या पदावर नियुक्ती केलेले २० आमदार अपात्र ठरवण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली आहे. निवडणूक आयोगाच्या शिफारशीवर राष्ट्रपती संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षातील भ्रष्टाचार उघड झाला असून अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.