‘अंतरिम अर्थसंकल्प नव्हे हा तर मोदी सरकारचा अंतिम जुमला’

टीम महाराष्ट्र देशा- काल सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पावरुन संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारचा अंतिम जुमला आहे. यातून दिल्लीच्या पदरी निराशाच पडली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.स्थानिक संस्थांना काहीही दिलं गेलं नाही. तसेच दिल्ली स्वत:च्या पायावरच उभी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाविरोधाच सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कोणतीच संवैधानिक तरतूद नसल्याचं म्हणत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

अॅडव्होकेट मनोहर लाल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली. राज्यघटनेमध्ये अंतरिम अर्थसंकल्पाची कोणचीही तरतूद नसून त्यात फक्त पूर्ण अर्थसंकल्प आणि व्होट ऑन अकाऊंटचीच तरतूद करण्यात आली आहे, असं या याचिकेत म्हटलं गेलं आहे.