अरविंद केजरीवाल नक्षलवादी ! सुब्रमण्यम स्वामींची कणखर टीका

नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याची टीका भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी केली आहे. केजरीवाल सात दिवसांपासून विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी ठिय्या मांडून बसलेले आहेत.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री हे नक्षलवादी आहेत. त्यांना इतर राज्यांचे मुख्यमंत्री पाठिंबा का देत आहेत, केजरीवाल यांना राजकारणातील काहीही कळत नाही. टूजी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुरू केलेली भ्रष्टाचारविरोधी मोहीम त्यांनी ‘हायजॅक’ केली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवून सत्ताही मिळवली. त्यानंतर हजारेंकडे पाठ फिरवली, असल्याचे स्वामी म्हणाले.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केरळचे पी. विजयन आणि कर्नाटकचे एच. डी. कुमारस्वामी यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठींबा जाहीर केला आहे.

You might also like
Comments
Loading...