fbpx

पाकिस्तान ७० वर्षात करू शकला नाही ते भाजपने तीन वर्षात घडवले – केजरीवाल

arvind kejriwal at jujau janmostav

सिंदखेडराजा: हिंदू मुस्लिम शीख इसाई हे भारत मातेचे चार पुत्र आहेत मात्र भावा भावात भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पाकिस्तान गेली ७० वर्ष भारतात जातीय दंगली घडवण्याचे स्वप्न बघत आहे, मात्र त्यांना जे जमल नाही ते अवघ्या 3 वर्षात भाजपने केल्याचा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने केजरीवाल यांनी सिंदखेडराजा येथे मातृतीर्थाचे आज दर्शन घेतले यानंतर झालेल्या सभेत त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजप आणि आरएसएसने कोरेगाव भीमाची दंगली घडवली, भाजप म्हणजे देशद्रोही आणि गद्दार पार्टी असून जनतेला आणखीन दंगे हवे असतील तर त्यांना मतदान करावे. तर शांतता आणि विकास हवा असल्यास ‘आप’ला साथ देण्याच आवाहन यावेळी अरविंद केजरीवाल यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील युवकांनी एकत्र येण्याची गरज आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्या मुलांना समान शिक्षण मिळणारा भारत निर्माण करायचा आहे. त्यामुळे युवकांनी एकत्र येवून गावागावात आप च्या शाखा उभ्या कराव्यात आणि भाजपाला लाथ मारून हाकलून लावाव.