लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव नको, सर्वांचा जीव सारखाच – केजरीवाल

arvind-kejriwal

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 7943 वर पोहोचली आहे. यासोबत दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येंने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. 4 लाख 52 हजार 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 42 हजार 458 जणांवर उपचार सुरु आहेत.

अशात कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी मांडले आहे. केजरीवाल म्हणाले की सर्वांचाच जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये. कोरोनाची लस देताना कोरोना योद्ध्यांना प्राधान्य द्यायला हवे. त्यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे.

कोरोनावरील लशीचं वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार मात्र राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लशीचं वितरण करण्यास प्राधान्य देईल. असंही केजरीवाल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या