‘माफी’नायक केजरीवाल यांचा पुन्हा एकदा माफीनामा

टीम महाराष्ट्र देशा : दल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सध्या माफी मागत सुटले आहेत. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी माजिठिया यांची माफी मागितल्यावरून त्यांच्याच पक्षात तांडव सुरु असतानाच आता केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माफी मागितली आहे. तसं पत्रही त्यांनी गडकरींना लिहिलं आहे.

पूर्ती घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी गडकरींवर २०१४ साली लावले होते. आता मात्र केजरीवालांनी माफी मागून हे प्रकरण बंद करण्याचा आग्रह केला. या प्रकरणी दोन्ही नेत्यांनी परस्पर सहमतीसाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या भारतातील सर्वात भ्रष्ट लोकांमधील यादीत सामील असल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता.

यावर स्पष्टीकरण देताना केजरीवाल म्हणाले की , राज्यसरकार मध्ये काम करताना कोर्टाचे चक्कर मारण्यात वेळ जात असल्याने कारभारावर लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, त्यामुळे हे प्रकरणं बंद व्हावेत म्हणून मी माफी मागत आहे.Loading…
Loading...