भाजपचे नेते तर सगळ्या देशात हिंदू तरुणींवर बलात्कार करतात : केजरीवाल

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे नेते तर सगळ्या देशात हिंदू तरुणींवर बलात्कार करतात असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केल्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथे शुक्रवारी झालेल्या अॅप्पल व्यवस्थापक विवेक तिवारी याच्या हत्येनंतर चर्चा आणि आरोपांचं संत्र सुरू झालं आहे. भाजपवर टीका करताना केजरीवाल यांनी हे ट्वीट केलं आहे.

केजरीवाल यांनी ‘विवेक तिवारी तर हिंदू होता, मग त्याला का मारलं? भाजपचे नेते तर सगळ्या देशात हिंदू तरुणींवर बलात्कार करतात. आपल्या डोळ्यांवरची झापडं दूर करा. भाजप हिंदुच्या हितासाठी नाहीये. सत्तेसाठी जर त्यांना हिंदुंना मारावं लागलं तर ते दोन मिनिटं सुद्धा विचार करणार नाहीत’ असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

खा. भडानांची पतियाळा हाऊस न्यायालयात केजरीवालांनी मागितली माफी

भाजपने शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचा चुराडा केला – केजरीवाल