दिल्लीत सर्वच जागांवर कॉंग्रेसचंं डिपॉझिट जप्त होणार , केजरीवालांना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीत प्रचाराला येऊन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी फुकट वेळ वाया घालवत आहेत. दिल्लीत सातही जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त होणार आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्यांनी प्रचार करायला हवा. त्या राज्यात त्यांची थेट भाजपशी लढत आहे. त्यांनी तिथे लक्ष घातलं तर काँग्रेससाठी ते फायद्याचं ठरेल, असंही केजरीवाल म्हणाले.

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही भाऊ-बहीण जिथे भाजपशी थेट टक्कर आहे त्या ठिकाणी जात नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, प्रियांकांनी दिल्लीत काँग्रेस उमेदवारांसाठी रोड शो करून मोठं शक्ती प्रदर्शन केलं.

Loading...