अरुंधतीचा मुलगा ‘यश’ची ‘आई कुठे…’मालिकेतून एक्झीट…!

अरुंधतीचा मुलगा ‘यश’ची ‘आई कुठे…’मालिकेतून एक्झीट…!

abhishek

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रियतेचे शिखर गाठणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ ही एक आहे. या मालिकेने लाेकांची मने जिंकले आहे. मात्र या मालिकेतील एक पात्र एक्झिट होणार असून प्रेक्षकांना मोठा धक्का बसणार आहे.

सध्या या मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असून मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक धक्कादाय गोष्ट आहे. या मालिकेतील अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारणारा ‘यश’ म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुख काही दिवसांसाठी मालिकेतून एक्झिट घेणार आहे.‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. या मालिकेत एका बाजूला अरुंधतीने घराचा काही हिस्सा गहाण ठेवल्याचे देशमुख कुटुंबाला समजते. तर दुसरीकडे अरुंधतीचा मुलगा यश हा कामानिमित्त १० दिवस बाहेरगावी जाणार असल्याचे दाखवलं जात आहे.

दरम्यान अभिषेक देशमुख याने कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेला असून सध्या अभिषेक हा त्याच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. त्याने त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामुळे पुढील काही दिवस अभिषेक या मालिकेत दिसणार नाही. यश म्हणजे अभिनेता अभिषेक काही दिवसांसाठी मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे कळताच या मालिकेचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. दरम्यान या मालिकेतील यशचे पात्र सर्वांचे फार लाडके ठरत आहे. आईच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा, घरातील जबाबदाऱ्या पार पाडणारा, भाऊ-बहिणीची काळजी घेणारा, समजुतदार यश सर्वांना भावतो आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मालिकेत यश दिसणार नसल्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करत असून त्याच्या आगमनाची वाट ही पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या