धोनीवर अशी वेळ येणं हे खूप मोठ दुर्दैव…!

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा माजी कर्णधार, दिग्गज फलंदाज महेंद्रसिंह धोनी एवढ्याच निवडत्ती घेण्याच्या विचारात नाही असे त्याचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार अरुण पांडे यांने स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांत धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीवर सर्वस्तरातून राजीनामा देण्यासाठी दबाब आणला जात आहे. मात्र, त्याचा अत्यंत खास मित्र असलेल्या अरुणने त्याच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. ”एवढ्यात निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. सातत्याने त्याच्या भविष्याबाबत उठणाऱ्य़ा अफवा या दुर्दैवी आहेत.” अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, भारताचा दिग्गज फलंदाज, यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रिकेट संन्यासाच्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. धोनीने बीसीसीआयला सांगितल्यानुसार, तो पुढचे दोन महिने क्रिकेटसाठी अनुपलब्ध राहील. धोनी पुढच्या दोन महिन्यांसाठी पॅरा सैन्य रेजिमेंटमध्ये सामील होत आहे. यावरून धोनी टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात सहभागी होणार नाही हे स्पष्ट आहे. टीम इंडिया 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. यादरम्यान तीन टी-20, तीन वनडे आणि दो टेस्ट मॅच खेळण्यात येतील. वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड रविवारी होणार आहे.

धोनीने संन्यासाची घोषणा अद्याप केलेली नाही. परंतु तो 2 महिने कोणत्याही क्रिकेट फॉरमॅटमध्ये दिसणार नाही. यापूर्वी धोनी वर्ल्डकपनंतर संन्यास घेणार असल्याची चर्चा सुरू होती. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर त्याचे मॅनेजर आणि मित्र अरुण पांडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. अरुण पांडे म्हणाले की, धोनी सध्या संन्यास घेणार नाही.