कॉंग्रेस हा संधिसाधू पक्ष; अरुण जेटलींची कॉंग्रेसवर टीका

arun jaitley

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस हा संधिसाधू पक्ष आहे त्यामुळेच त्यांनी जीएसटीच्या आर्थिक सुधारणांचा विरोध केल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. जेटली हे सध्या जागतिक बँकेच्या वार्षिक सभेसाठी अमेरिकेत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी हि टीका केली आहे. तसेच जगभरात नोटबंदीच्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत असल्याच सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.

देशात आर्थिक सुधारणा आणण्यासाठी धाडस करण्याची गरज लागते. नोटबंदी आणि जीएसटी हे धाडसी निर्णय असून जगभरातील लोक या निर्णयाचे कौतुक करत असल्याचेही जेटलींनी म्हणाले आहेत. जगभरात आर्थिक मंदी असतानाही मागील तीन वर्षात भारतात परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.