पुलवामा दहशतवादी हल्ला : दहशतवादी हल्ल्यात मदत करणाऱ्या दहशतवादी संघटनांना मोठी किंमत मोजावी लागणार – अरुण जेटली

टीम महाराष्ट्र्र देशा : पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्याचे भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी सामाजिक स्तरातून मागणी होत आहे. याच पार्शवभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं. पाकिस्तान विरुद्ध ठोस भूमिका घेतली आहे. सरकारकडून पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्यात येणार आहे . अशी माहिती केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली.

दरम्यान अरुण जेटली यांनी या दहशतवादी हल्ल्यात मदत करणाऱ्या दहशतवादी संघटनांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. असा इशारा देखील दिला. गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले. गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

हा हल्ला आत्मघातकी असून दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हा सूत्रधार असल्याचं पुढं येत आहे. जैश – ए – मोहम्मद चा मोहरक्या मसूद अझहर आणि अब्दुल रशीद गाझी हे निकट वर्तिय आहेत त्यामुळे हा हल्ला मसूद अझहर ने अब्दुल रशीद च्या मदतीने घडवून आणला असल्याचं समोर येत आहे.

आता भारतात पुलवामा येथील झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. संबंध भारत वासियांकडून ४२ जवानांच्या या बलिदानाचा बदला घेण्याची मागणी होत आहे.