जेटलींनी मला शिवीगाळ केली ; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी वित्तमंत्री अरुण जेटलींवर शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. जेटलींनी मला शिवीगाळ केली, पण उत्तरं देण्याचं टाळल्याचा उल्लेखही राहुल गांधींनी केला आहे.

लोकसभेत राफेलवर चर्चा सुरू असताना पंतप्रधान मोदी सभागृहातून पळून गेले. अरुण जेटलींनी मोठं भाषण दिलं. पण एकाही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले. ज्या ज्यावेळी पंतप्रधान मोदींच्या जागी संरक्षणमंत्री स्पष्टीकरण देतील त्यावेळी सरकारला काँग्रेसच्या प्रश्नांचा सामना करावा लागेल, असं म्हणत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.