विजय माल्ल्याशी भेट झालीच नाही : अरुण जेटली

टीम महाराष्ट्र देशा- देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना भेटल्याचा दावा ब्रिटन येथील न्यायालयाबाहेर मद्यसम्राट माल्ल्या याने केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कधीही माझी रीतसर भेट माल्ल्याने घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कधीही माल्ल्याला भेटीची वेळ दिली नव्हती. त्याचे व्यक्तव्य खोटारडेपणाचे असल्याचेही जेटली यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अर्थमंत्र्यांबाबत माल्ल्याने केलेले व्यक्तव्य हे अतिशय गंभीर असून याप्रकरणी अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.राहुल गांधी यांनी ट्विट करून ही मागणी केली.

या प्रकरणाची पंतप्रधानांनी स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान, विजय माल्ल्यासोबत झालेल्या चर्चेबाबत अर्थमंत्री जेटली यांनी संसदेला माहिती का दिली नाही? असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

राहुल गांधी पंतप्रधानांची गळाभेट घेतात मात्र आयकर अधिकाऱ्यांपासून लांब पळतात : स्मृती इराणी