कॉंग्रेस शीख दंगलीतल्या आरोपीला मुख्यमंत्री करतेय – अरुण जेटली

arun jaitley

टीम महाराष्ट्र देशा – १९८४च्या शीख दंगलप्रकरणात शीख समाज काँग्रेसच्या ज्या नेत्याला दोषी मानते, त्या नेत्याला काँग्रेस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ देत आहे. असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. शीख दंगलीतील आरोपी सज्जनकुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने आज दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, दुसऱ्या आरोपीला काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देत असल्याची टीका केंद्रिय मंत्री अरूण जेटली यांनी केला आहे.

शिक्षा सुनावण्यात आलेला सज्जन कुमार हा १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीचे प्रतिक आहे. आहेत. शीख दंगल प्रकरणात आता शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे काँग्रेस आणि गांधी परिवाराच्या गळ्याभोवतीचा फास आवळला जात आहे, असही यावेळी जेटली म्हणाले. १९८४ च्या शिख दंगल प्रकरणात कमलनाथ यांच्यावरही आरोप झाले होते. कमलनाथ आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.