अरुण जेटली काळाच्या पडद्याआड, वकिल ते राजकीय नेता एक विलक्षण प्रवास

blank

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दुख:द निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

जेटली यांना ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. तसेच अरुण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव २०१९च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. अरुण जेटली हे देशाच्या राजकारणातील मोठे नेते होते. त्यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशाच्या अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारली होती.

वाचा अरुण जेटली यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा

जेटली यांची ओळख राजकारणी अशी असली तरी त्यांनी CA व्हायचे होते.पण ते होऊ शकले नाहीत. त्यानंतर वकीलीचे शिक्षण पूर्ण करून जेटली यांनी 1987पासून सर्वोच्च न्यायालयात आणि अनेक उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. 1990मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अशी त्यांची ओळख तयार झाली होती. 1991पासून त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 1999च्या लोकसभा निवडणुकीत ते पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार होता. त्याच बरोबर ते निर्गुंतवणूक मंत्रालयाचे देखील मंत्री होते. वाजयेपी यांच्या मंत्रिमंडळातून राम जेठमलानी यांनी राजीनामा दिल्यानंतर जेटलींकडे कायदा आणि न्याय तसेच कंपनी व्यवहार या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 2004 ते 2014 याकाळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते.