fbpx

अरुण जेटलींच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान : केजरीवाल

टीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ अरुण जेटली यांचे निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ‘माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री अरुण जेटली यांचे अकाली निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे. कायदेशीर तरतुदी आणि त्यांच्या कारभाराच्या कौशल्यासाठी परिचित होते. त्यांचा अनुभवाला देश मुकेल. या दु:खाच्या क्षणी मी त्यांचा परिवारासमवेत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. असं ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘भाजपाचे दिग्गज नेते श्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मनापासून दु: खी झाले आहे. आम्ही एक चतुर संसदपटू, उत्साही वाचक आणि एक दयाळू नेता गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असं शरद पवार यांनी म्हटले आहे.