अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी

rahul gandhi

टीम महाराष्ट्र देशा- कर्जबुडवा उद्योगपती विजय माल्ल्याने देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना भेटल्याचे वक्तव्य केले होते. अर्थमंत्र्यांबाबत माल्ल्याने केलेले व्यक्तव्य हे अतिशय गंभीर असून याप्रकरणी अरूण जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.राहुल गांधी यांनी ट्विट करून ही मागणी केली.

या प्रकरणाची पंतप्रधानांनी स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. दरम्यान, विजय माल्ल्यासोबत झालेल्या चर्चेबाबत अर्थमंत्री जेटली यांनी संसदेला माहिती का दिली नाही? असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. माल्ल्या भारतीय बँकांची लूट करून पळून गेला. यानंतर संसदेत माल्ल्याबाबत चर्चा झाली, तेव्हाही एवढी गंभीर बाब लपवून ठेवण्यात आली, याबाबत शर्मा यांनी आश्चर्य व्यक्त केले.