देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही – अरुण जेटली

Arun Jetli PUNE

टीम महाराष्ट्र देशा: देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यताच नाही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही एकत्र होणार नाहीत . जोपर्यंत सर्व पक्षांची सहमती होत नाही तोपर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, अस अर्थमंत्री देशाचे अर्थंमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल आहे. न्यूज18 समुहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं आहे.

राजस्थान पोट निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दुसरीकडं कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होईल असंही त्यांनी सांगितलंय. कच्च्या तेलाच्या किंमती 60 डॉलर प्रतिबॅरल राहणं, समाधानकारक मान्सून राहिल्यास देशाचा जीडीपी चढता राहील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.