fbpx

अरुण जेटली यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

टीम महाराष्ट्र देशा:- माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी दिर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी १२ वाजून सात मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालावली . जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.

जेटली यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. अरुण जेटली यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून भाजप कार्यालयात आणण्यात येणार आहे. तर अरुण जेटली यांच्यावर आज दुपारनंतर होणार अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वाचा अरुण जेटली यांच्या कारकीर्दीचा थोडक्यात आढावा

जेटली यांची ओळख राजकारणी अशी असली तरी त्यांनी CA व्हायचे होते.पण ते होऊ शकले नाहीत. त्यानंतर वकीलीचे शिक्षण पूर्ण करून जेटली यांनी १९८७ पासून सर्वोच्च न्यायालयात आणि अनेक उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. १९९० मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अशी त्यांची ओळख तयार झाली होती. १९९१ पासून त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 1999च्या लोकसभा निवडणुकीत ते पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते. वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार होता. त्याच बरोबर ते निर्गुंतवणूक मंत्रालयाचे देखील मंत्री होते. वाजयेपी यांच्या मंत्रिमंडळातून राम जेठमलानी यांनी राजीनामा दिल्यानंतर जेटलींकडे कायदा आणि न्याय तसेच कंपनी व्यवहार या मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. २००४ते २०१४ याकाळात ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते.