fbpx

माजी अर्थमंत्री अरुण जेटली अनंतात विलिन

टीम महाराष्ट्र देशा:- माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी दिर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास गेतला. नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. जेटली यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटलींचा मुलगा रोहन यांने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला.

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी आज सकाळी अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरून भाजपाच्या मुख्यालयात आणण्यात आले होते. तेथे भाजपाच्या अनेक नेत्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

जेटली यांना ९ ऑगस्टला ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना प्राणरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांनी शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली हे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या युगातून नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाखालील भाजप युगात सहज संक्रमण करणाऱ्या भाजपच्या मोठय़ा नेत्यांपैकी जेटली एक होते.