माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन ,राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक

टीम महाराष्ट्र देशा:-  देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

अरुण जेटली यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. आजाराला त्यांनी नेटाने लढा दिला. निष्टावंत वकील, उत्तम संसद पटू आणि प्रतिष्टीत मंत्री, त्यांनी देशाच्या उभारणीसाठी मोठं योगदान दिले आहे.असे ट्विट कोविंद यांनी केले आहे .

जेटली यांना ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या