स्विस बँकेत कुठलाही काळा पैसा जमा झाला नाही; जेटलींचा खुलासा

arun jaitley

नवी दिल्ली : स्विस बँकेत मागील चार वर्षात भारतीयांचे 50 टक्के पैसे वाढले असल्यचं बँकेनं दिलेल्या अहवालातून समोर आलं होतं. यावरून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्विस बँकेतील तो पैसा काळा नसल्याचा खुलासा केलाय.

ज्या भारतीयांचा पैसा बँकेत आहे त्यात भारतीय निवासी आहेत असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. जेटली यांनी फेसबुकवर एक ब्लाॅग लिहून स्विस बँकेच्या प्रकरणावर खुलासा केलाय.

स्विस बँकेत ज्यांनी पैसे ठेवले आहे त्याची माहिती मिळवण्यास कोणतीही सुविधा नव्हती. पण वाढत्या दबावामुळे बँकेनं तशी तयारी दाखवली. आता ज्या देशांनी माहिती मागितली ती दिली जात आहे अशी माहितीही यावेळी जेटली यांनी दिली. जानेवारी 2019 पासून भारताला अशा खात्यांची माहिती मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कॉंग्रेस हा संधिसाधू पक्ष; अरुण जेटलींची कॉंग्रेसवर टीका

स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा 50 टक्क्यांनी वाढला

 Loading…
Loading...