भारतात मंदी नसल्याची जगभरात भावना – अरुण जेटली 

arun jaitley

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असल्याची भावना जगात कुठेच अस्तीस्त्वत नसल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ज्यांना अर्थव्यवस्थेची जाणच नाही अशा मंडळींकडून मंदीची ओरड सुरू असल्याचा टोला जेटली यांनी लगावला आहे.

न्यूयॉर्कमध्ये कोलम्बिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना त्यांनी हि भूमिका मांडली. अरुण जेटली हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ते जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या नियोजित वार्षिक बैठकांनाही हजेरी लावणार आहेत.Loading…
Loading...