तब्बल ३४ वर्षांनी अरुण गोविल साकारणार ‘या’चित्रपटात ‘राम अवतार’

तब्बल ३४ वर्षांनी अरुण गोविल साकारणार ‘या’चित्रपटात ‘राम अवतार’

ArunGovil

मुंबई : टीव्हीवर रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान श्राीराम यांची भूमिका साकारून घरोघरी लोकप्रिय असा अभिनेता अरुण गोविल. आता तब्बल ३४ वर्षांनीं मोठ्या पडद्यावर अरुण गोविल हे पुन्हा प्रभू श्री राम या भूमिकेत झळकणार आहे. यानिमित्त प्रेक्षकांना त्यांचा अभिनय पाहण्याची संधी  मिळणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार च्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी अरुण गोविल पुन्हा एकदा हीच भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.’ओह माय गॉड २’ या चित्रपटाची निर्मिती अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार करत आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, अक्षय कुमारला अरुण गोविलने या चित्रपटात भगवान रामची भूमिका साकारावी अशी इच्छा होती. भगवान रामच्या भूमिकेसाठी अरुणपेक्षा अधिक परिचित दुसरा चेहरा नाही. निर्मात्यांनी मिळून हा निर्णय घेतला. ‘ओह माय गॉड २’ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम ही असणार आहे.

या चित्रपटाचा पहिल्या भागात धार्मिक कट्टरता आणि अंधश्रद्धेवर आधारित असताना, दुसरा भाग भारतीय शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी क्रू १३ ऑक्टोबर रोजी उज्जैनला रवाना होणार होता, परंतु क्रूचे तीन सदस्य कोव्हिड -१९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शूटिंगची तारीख २३ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. .या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय करणार असून आगामी चित्रपटात अरुण गोविल यांना पाहण्यासाठी चाहत्यांना मात्र उत्सुकता लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या