कलाकार हे गरजू व्यक्तिना मदत करतात फ़क्त ते जाहिरात करत नाहीत : अमिताभ बच्चन

amitabh bachhan

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हपुर – सांगली जिल्ह्यावर आलेली जलआपत्ती ही टळली आहे. मात्र या आपत्तीमुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावगावच्या गाव उधवस्त झाली आहेत. त्यामुळे पुरग्रस्ताना मदत करण्यासाठी अनेक हात पूढे आले आहेत. सर्वानी आपल्या परीने मदत केली आहे. मात्र बॉलीवुड कलाकार अजून देखील मदतीसाठी आले नाहीत अशी टीका मनसेने केली होती.

याच पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी याचे उत्तर ‘कोन बनेगा करोड़पती’ च्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले. कलाकार हे नेहमी गरजू व्यक्तिना मदत करतात फ़क्त ते जाहिराती करत नाही मी देखील मदत करणार आहे, या बाबत माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे असे अमिताभ बच्चन बोलले.

कोल्हापूर सांगली येथे ९ दिवस झाले पुराने पूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. या महापुरा मध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेकांची घरे पडली आहेत. सध्या परिस्थिती सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. हळूहळू पुराचे पाणी ओसरत आहे. महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात ४० जणांचा मृत्यू झाला असून, ब्रह्मनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक व्यक्ती सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रक जारी करुन बॉलिवूड कलाकारांनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केलं असल्यावर बोट ठेवलं आहे. ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’ असं म्हणत मनसेने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.“समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण… महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत?” असा प्रश्न मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विचारण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या