ज्येष्ठ कलावंत रमेश भाटकर यांचे दीर्घआजाराने निधन

टीम महारष्ट्र देशा : ज्येष्ठ कलावंत रमेश भाटकर यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घआजाराने निधन झाले आहे.रमेश भाटकर हे गेले अनेक दिवस कर्करोगाने ग्रस्त होते.मुंबईच्या एलिझाबेथ  रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  हॅलो इन्स्पेक्टर , दामिनी, कमांडर या प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी काम केले. तसेच १९७५ साली अश्रूंची झाली फुले या नाटकात त्यांनी रंगमंचावर लाल्याची भूमिका साकारली.

रमेश भाटकर हे गेले अनेक दिवस कर्करोगाशी झुंज देत होते. पण अखेर मुंबईच्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत चंदेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या पण त्यातल्या हॅलो इन्स्पेक्टर या मालिकेतली त्यांची इन्स्पेक्टरची भूमिका विशेष गाजली. तसेच रमेश भाटकर यांनी रंगभूमीवर देखील विशेष काम केले. अश्रूंची झाली फुले , केव्हा तरी पहाटे,अखेर तू येशीलच , राहू केतू इ. नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या.