सुषमा स्वराज – उत्तम वक्ता, कुशल प्रशासक, सहृदय व्यक्ती

धनश्री राऊत : ‘उत्तम वक्ता, कुशल प्रशासक, सहृदय व्यक्ती’ अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याचं मंगळवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सुषमा स्वराज या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नंतर परराष्ट्रमंत्री खात संभाळणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या होत्या. सुषमा स्वराज यांनी २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मोदीच्या परराष्ट्र नीतीमध्ये सुषमा स्वराज यांचा नेहमीचं महत्वाचा वाटा राहिला.

स्वराज यांच्या जाण्याने भाजपचं तर मोठ नुकसान झाल आहे, मात्र राजकारणातील एक अत्यंत हुशार आणि प्रभावी राजकारणी या देशाने गमावलेला आहे. तसेच सुषमा स्वराज यांची भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून जनमानसात ओळख होती. त्यामुळे त्यांची उणीव देशाला जरूर जाणवेल.

सुषमा स्वराज यांची राजकीय कारकीर्द

  • जन्म १४ फेब्रुवारी १९५२ हरयाणा राज्यातील अंबाला.
  • अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी
  • पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी
  • १९७३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली
  • १९७५ मध्ये स्वराज कौशल यांच्याशी विवाह
  • वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री
  • १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड
  • १९९० मध्ये राज्यसभा सदस्य
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री
  • नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज काळाच्या पडद्याआड

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज काळाच्या पडद्याआड

वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा एमआयएमचा नगरसेवक वर्षभरासाठी तुरुंगात रवानगी