#Article370 : लहू था जो लाल मेरा,अब वो है तिरंगे की लहर

टीम महाराष्ट्र देशा : गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवला आहे. हा प्रस्ताव सभागृहात मांडताच विरोधकांनी मोठा गदारोळ घातला. जम्मू काश्मीरचे विभाजन करण्यात आले असून जम्मू-काश्मीरसह लडाखलाही केंद्रशासित घोषित करण्यात आले आहे. म्हणजेच जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होणार आहेत.

याविषयी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर यांनी एक कविता ट्वीट करून अखंड भारताविषयी भाष्य केले आहे. या कवितेत त्यांनी मी भारताचे तुकडे करणार नाही. तसेच भगवा रंग माझाच आहे, हिरवाही माझा आहे. कुणाशीही वैर नाही. ज्यासाठी आम्ही लढा दिला, तो आता भारताच्या तिरंग्याची शान वाढवत आहे. अस गंभीर यांनी म्हटले आहे.

आम्ही जम्मू – काश्मीरबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतो. जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदेल आणि विकास होईल, अशी आमची आशा आहे, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेचे ३७० वे कलम रद्द करण्याच्या सरकारने केलेल्या शिफारसीला पाठींबा दिला आहे.

तसेच शिवसेनेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. सरकारच्या या पोलादी निर्णयाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याच उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आज खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला असंही विधान केले आहे.

#Article370 : ‘भाजपाने राज्यघटनेची हत्या केली’

370 कलम हटविण्याचा प्रस्ताव सादर करताच कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचा थयथयाट

मोदी सरकारचा धमाका ; जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव