fbpx

आद्य समाज क्रांतीकारक : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

गेल्या ८०० वर्षात महाराष्ट्रात अनेक राजकीय-सामाजिक-धार्मिक लाटा येवून गेल्याची इतिहासात नोंद आहे. १२ व्या शतकात महाराष्ट्रात देवगीरीकर यादव राजांची सत्ता होती. त्यानंतर दिल्लीच्या अल्लाउद्दीन खीलजीची सत्ता आली. त्यानंतर अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा येथील मुसलमान शासकांची सत्ता, त्यानंतर शिवाजी राजांचे शिवशाहीचे सुराज्य नंतर पेशवाई, नंतर र्इंग्रज, रजाकार व
आता भारतीय सार्वभौम प्रजासत्ताकाची सत्ता ……

शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात

या राजकीय घडामोडीच्या वादळातही महाराष्ट्रीय समाज स्थिर होता. कारण राजकीय लढायांचा, सत्ताबदलाचा थेट परिणाम समाजातील गावगाड्यावर होत नसे. सरदार, सुलतान , राजे-महाराजे आपसात लढाया करीत ; तह करीत ; खंडण्या घेत ; खंडण्या देत. कुणीही राज्यकर्ते सत्ताधारीबनले तरी प्रजा आपला ठरवून दिलेला कर भरुन मोकळी होत असे व नशिबाला दोष देत असे. याला
अपवाद फक्त शिवाजी राजांच्या शिवशाहीचा होता. शिवाजी राजा हा खऱ्या अर्थाने प्रजेचे हित पाहणारारयतेचा राजा होता. शिवशाहीचा अपवाद वगळता ईतर सर्व राज्यकर्ते हे सत्ता संघर्ष ऐश-आराम, विलासी जीवन व रंगेल उपभोगात मशगुल होते….

Maharaj

बारा बलुतेदार, गावगाडा व शेती व्यवसायात महाराष्ट्रीय समाज स्वयंपूर्ण होता. गावतल्या गावातत्याच्या सर्व गरजा भागविल्या जात. राजकीय सैन्य गावात येवून अन्याय्यकारक कर वसूल करुन जात.त्यांचा कर त्यांना मिळाला म्हणजे ते निघून जात व पून्हा गावात फिरकतही नसत. एवढ्या पुरताच राज्यकर्त्यांचा गावात संबंध येई…..

गावात खरी सत्ता ही धर्ममार्तंडांचीच होती. समाजावर त्यांचेच वर्चस्व होते. हे धर्ममार्तंड राज्यकर्त्यांशी जुळवून घेत असत व आपली धर्मसत्ता समाजातील सर्व स्तरात मजबूत करीत असत….१२ व्या शतकात हेमाद्री, ब्रम्हसानू व महदाश्रम या धर्म पुरोहितांनी आपली चातुवण्र्य व्यवस्था समाजात बळकट करण्यासाठी देवगीरीच्या यादव राजवटीचा पुरेपूर उपयोग करुन घेतला. व्रत-वैकल्य,
उपास-तापास, शुद्र देवी देवतांची तामस भक्ती, देवतेला दिले जाणारे पशू-पक्षांचे बळी इत्यादी कर्मकांडातसमाजाला गुंतवून टाकले. खऱ्या  परमेश्वर भक्ती पासून समाजाला वंचित ठेवले. भगवत् गीतेतीलपरमेश्वरीय ज्ञान समाजाला कळू नये म्हणून संस्कृत भाषा फक्त ब्राम्हणांनीच अभ्यासावी हा नियम बनवीला. ब्राम्हणा व्यतीरिक्त सगळे शूद्रच आहेत. शूद्रांनी फक्त चाकरीच करावी. स्रीयांना ज्ञान सांगू नये. त्यांना धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाही. संन्यास घेण्याचा व मोक्षाचाही अधिकार नाही. असे समाजाला फसविणारी विचार धारा सांगून शोषण करणारी व्यवस्था समाजात रुजवीली. त्यामुळे समाज दैन्य-दु:ख व अधोगतीने पिचून गेला होता….

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या धर्ममार्तंडांना विरोध केला. आपल्या अमोघ व रसाळ वाणीने त्यांनी जीवोध्दाराचे तत्वज्ञान मराठी भाषेतून समाजा समोर मांडले. जीव ही एकच जात आहे. या जीवांपैकी कुणी स्रीच्या देहात, कुणी पुरुषांच्या देहात, कुणी पशु-पक्षांच्या देहात गेले. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र सर्व जातीचे स्री-पुरुष हे जीवच आहेत. अनादी काळापासून सर्व जीव एकसमान आहे. कुणी उंच नाही कुणी
निच नाही. विटाळ-चांडाळ नाकारुन सत्य धर्म समाजात प्रस्थापीत केला. त्या काळातील धर्मपुरोहीत उच-निच, देवी-देवतांचे कर्मकांड सांगून मानवामध्ये विषमता पेरीत होते. जाती भेदाचे पाश समाजाच्या मानेभोवती आवळून टाकीत होते. त्यामुळे समाज अधोगतीला जात होता. मनुष्याने या धर्म पुरोहीतांनी सांगितलेल्या क्षूद्र देवी-देवतांच्या नादी न लागता स्वत:च्या उध्दारासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी
कर्मभूमी मध्ये अवतरलेल्या परमेश्वर आवताराची भक्ती करावी. आम्हाला शरण यावे. परंतु कोणत्याही स्थितीत धर्म पुरोहितांनी सांगीतलेल्या विषमता मुलक देवता कर्मकांडाला बळी पडू नये. असे सांगून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात महाराष्ट्रात महान अनुभवी क्रांतीकारी विचाराची ज्ञानगंगाप्रवाहित केली. याच विचार सरणीला महानुभाव संप्रदाय म्हणून समाजात ओळखले जाते……

विश्वस्ताचे प्रसिद्धीपत्रक : देवस्थानचा धक्कादायक कारभार उघड ? 

 या सु-स्पष्ट क्रांतीकारी विचार सरणीने महाराष्ट्र ढवळून निघाला. श्री चक्रधर स्वामींचे विचार खालील प्रमाणे होते.
१) उत्तम भणीजे ब्राम्हण : आन् आधम भणीजे मातंग : ऐसे म्हणे : परी तोही मनुष्य देहची : आन्
निष्पत्ती कारकची असे : परि वृथा कल्पणा करी :
२) महारवाडाहूनी धर्म काढावा :
३) कर्मचांडाळापसी जाती चांडाळ तो चांग :
४) चातुवण्र्य चरेत् भैक्ष्यम् यानुसार चारही वर्णाच्या घरी भीक्षा मागून काला करुन भोजण करावे.
५) मातंगाच्या हातचा लाडू स्वीकार केला व ब्राम्हणांमध्ये प्रसाद म्हणून वाटला.
६) पवित्र म्हणीजे गाय : अपवित्र म्हणीजे सुने : एवं पशू देहची : आन् अमंगळ भक्षक : परि वैâसी
कल्पना करी :
७) विटाळ म्हणीजे मातंगाचा : तथा ऋतूमती स्रीचा मानी : आन् निरय देही सिंदीचा वृक्ष सदा पाणी
वाहे : तयाचा न मानी : आन् आपुल्या देही लार शेंबूंड वाहे : अथवा मलमूत्र वाहती : अमंगळ द्वारे असती :
तयाचा विटाळ न मानी :
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वरील कृतीशील क्रांतीकारी विचारांमुळे वैदिक कर्मकांडी धर्ममार्तंडांचे धाबे दणानले. समाजात वैचारिक लाटा निर्माण झाल्या. चारही वर्णातील स्री-पुरुष अनुयायी होऊन स्वामींनाअनुसरु लागले… सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार पुढिल काळात त्यांचे ब्राम्हण शिष्य नागदेवचार्यांच्या मदतीने त्या काळातील विद्वान पंडित म्हार्इंभट्टांनी “लीळाचरित्र’’ ग्रंथात जतन करुन ठेवले आहेत. या लीळाचरित्र ग्रंथाच्या आधाराने पुढे हजारो ग्रंथ मराठी भाषेत लिहून मराठी भाषा समृध्द झाली. अनेक प्रकारच्या राजकिय-सामाजिक व नैसर्गिक अडी-अडचणीवर मात करुन श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचे वहन करणारी “भिक्षुक’’ नावाची संन्यासी अनुयायांची फळी श्री नागदेवाचार्य नावाच्या ब्राम्हणाने उभारली. या भिक्षुक वर्गात १८ पगड जातीचे स्री-पुरुष अनुयायी संन्यास देऊन सहभागी करुन घेतले जात. याच भिक्षुक वर्गाने गेल्या ८०० वर्षा पासून महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब-बलुचिस्तान पर्यंत श्री चक्रधर स्वामींचे विचार पोंहचविण्याचे महान कार्य केले व आजही हे कार्य चालूच आहे. सर्वज्ञ श्रीचकधर स्वामींंच्या ७९६ व्या अवतार दिना (जयंती) निमीत्त सर्व अनुयायांना व महाराष्ट्र वासियांना शुभेच्छा…!
(संदर्भ ग्रंथ-लीळाचरित्र, स्मृतीस्थळ, महानुभावांचा इतिहास)

लेखक- महंत प्रज्ञासागरबाबा महानुभाव
कार्याध्यक्ष : अखिल भारतीय महानुभाव साहित्य महामंडळ,
संपादक : पाक्षिक `महदंबा स्मृती’, श्रीक्षेत्र खणेपुरी, जि.जालना

श्रीक्षेत्र देवगड येथे समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा पुण्यतिथी महोत्सव

छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे