शिवसेनेला सोडून गेलेल्या ‘या’ दिग्गज नेत्यांना पुढे जनतेनेचं शिकवला धडा

blank

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली . आता पक्ष आहे म्हटल्यावर मतमतांतरे ,वाद-विवाद , आणि बंड हे सर्व इतर पक्षांप्रमाणे या पक्षात देखील झाले. मात्र शिवसेनचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षाला रामराम ठोकणारे दिग्गज नेतेमंडळी हळूहळू निष्प्रभ होत गेले. जो रुबाब,जो दरारा शिवसेनेत असताना होता,तो इतर पक्षात जाऊन त्यांना पुन्हा प्राप्त झाला नाही.

छगन भुजबळ,नारायण राणे, राज ठाकरे,  बाळा नांदगावकर , संजय निरुपम , आनंद परांजपें , अभिजित पानसे या नेत्यांची आजची अवस्था काय आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या नेत्यांना बाळासाहेबांनी घडवले त्यांनीच पुढे दगा दिला. जनता हे सर्व पाहत होती. बाळासाहेबांना धोका देणाऱ्या या नेत्यांना पुढे जनतेने धडा शिकवला.

NCP leader Chhagan Bhujbal.

छगन भुजबळ- १९९१ मध्ये त्यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेशी टोकाचे मतभेद झाले आणि कालांतराने त्यांनी याचवर्षी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांनी सुरुवातीला कॉग्रेसमध्ये प्रवेश केला नंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी कॉग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भुजबळ त्यांच्यासह राष्ट्रवादीत दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली.  एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले .

२००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. नियतीची चक्रे फिरली , महाराष्ट्र सदनासह अन्य काही गैरव्यवहारांप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि आणि भुजबळांची रवानगी तुरुंगात झाली. सध्या भुजबळ जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत मात्र २०१४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत  भुजबळ यांचा शिवसेनेच्याच हेमंत गोडसे यांनी अतिशय मोठा दारूण पराभव केला.

Narayan-Rane.

नारायण राणे- शिवसेना-भाजप सरकारकाळात दुसरे मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे यांनी काम पाहिले.उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या मतभेदांनंतर  २००५ साली शिवसेनेचा त्याग करून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत डझनभर आमदार गेले. २००९ साली पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली.

जे आमदार राणेंसोबत शिवसेना सोडून जाताना होते त्यापैकी आजच्या घडीला कालिदास कोळंबकर सोडल्यास कुणी नव्हते. मात्र नवीन पक्ष काढला तेव्हा कालिदास कोळंबकर सुद्धा सोबत नव्हते. राणेंच्या मुलाचा लोकसभेत मोठा पराभव झाला असून दस्तुरखुद्द नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी बालेकिल्ल्यात दारूण पराभव केला. सध्या राणे भाजपच्या मेहरबानीने राज्यसभा खासदार आहेत.

blank

गणेश नाईक- सरुवातीला शिवसेना पक्षातून आमदार त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेटमंत्रीपद भूषवले. पुढे १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.मात्र, त्यानंतर लगेचच झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

२०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत नाईक कुटुंब पराभूत झाले. विधानसभेत दस्तुरखुद्द गणेश नाईक यांचा सुद्धा पराभव झाला. संजीव नाईक यांचा लोकसभा आणि गणेश नाईक यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांचे समर्थक पुरते हताश झाले आहेत.

blank

राज ठाकरे- ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकिर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःला समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला. शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे यांनी २००६ च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला.काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली.

२००६मध्ये मनसे हा नवा पक्ष स्थापन केला. पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार निवडून सुद्धा आणले. मात्र, नियतीने इंगा दाखवला. पक्षाने जनतेचा विश्वास गमावला. मागील विधानसभेच्या निवडणुकीत मनसेच्या आमदारांची संख्या १३ वरून १ वर आली तर नाशिक महानगरपालिका सुद्धा हातून गेली. राज सध्या भाजपवर टीका करण्याचा आणि व्यंगचित्रे काढण्याचा एककलमी अजेंडा राबवताना दिसत आहेत.

बाळा नांदगावकर अशोक खांडेभराड ,संजय निरुपम कृष्णराव इगळे, राहुल नार्वेकर, भाऊसाहेब वाकचौरे,आनंद परांजपे, अभिजित पानसे अशी यादी बरीच मोठी आहे मात्र या सर्वांची आज परिस्थिती वर विस्तृत माहिती दिलेल्या चौघांपेक्षा वेगळी नाही.