आकर्षण की कल्पना; जळजळीत वास्तव ‘बुधवार पेठे’चं

article-on-red-light-area-budhwar-peth-pune

प्रमोद लांडे: ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण सर्वत्र ऐकायलाही मिळते. तसं पाहायला गेलं तर एकंदरीत पुण्याचा इतिहास हा भव्यदिव्य आहे आणि जुनाही.पण पुण्याला मात्र एका गोष्टीमुळे जगभर प्रसिद्धी आहे ती म्हणजे सांस्कृतिक शैलीमुळे आणि याच पुणे शहरात असणाऱ्या बुधवार पेठेमुळे. बुधवार पेठेत फक्त चालणाराचा नव्हे तर पळणारा वेश्या व्यवसाय हा सर्वत्र विषय बनला आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीनंतर पुण्यात पेशवाई सुरू झाली.पुण्याच्या संपन्न असण्यात पेशव्यांचा मोठा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.अनेक मंदिरे भव्य,दिव्य वास्तू, याचबरोबर पेशव्यांनी व्यापाराच्या दृष्टीने सर्वांनाच सोयीचे व्हावे म्हणून अनेक पेठा वसवल्या यापैकीच एक म्हणजे बुधवार पेठ. आज महाराष्ट्र देशा वर पाहुयात बुधवार पेठेचा इतिहास आणि त्यामागील काही रंजक गोष्टी…

पुणे शहर तसं ओळखलं जातं ते म्हणजे सांस्कृतिक शहर म्हणून . पुणे शहरात अनेक पेठा आहेत जसं सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ,र विवार पेठ या व्यतिरिक्तही अनेक पेठा आहेत, ज्या मूळपेठा आहेत त्या पेशव्यांनी आठवड्याच्या वाराप्रमाणे नावे ठेवली आहेत. पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेटचा जो रोड आहे. या रस्त्याची रुंदी कमी आहे, कारण हा जो रस्ता आहे तो मूळ शहरातून म्हणजेच पेठांच्यातून असल्याकारणाने हा रस्ता अरुंद आहे.याच रस्त्यालगत बुधवार पेठ आहे आणि याच बुधवार पेठेत पुण्याचं वैभव मानलं जाणारे सुप्रसिद्ध दगडुशेठ गणपती मंदिर याच ठिकाणी आहे. आप्पा बळवंत चौक ही पुस्तकांची मोठी बाजारपेठही इथेच आहे. तसेच बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे खुप मोठे व्यवसाय केंद्र आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी सुरु केलेली मुलींची पहिली शाळाही बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरु केली होती, मात्र या विषयाला सुद्धा आज कुणी स्मरणात आणत नाही. बुधवार पेठेत वेश्या वसाहतीची ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांची शारीरिक सुखाची गरज भागविण्यासाठी कम्फर्ट झोन म्हणुन वेश्या वसाहतीची निर्मिती केली. ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंटणखाने निर्माण केले. पुण्यात १९४१ साली मार्गो चा अड्डा हा कुंटणखाना प्रसिद्ध होता. तेव्हापासून हा कुंटणखाना प्रसिद्ध आहे. पुण्यातील बुधवार पेठेत भारतीय, बांगलादेशी आणि नेपाळीमुली या व्यवसायात आहेत, मात्र नेपाळी मुली मोठ्या संख्येने दिसुन येतात. काही वर्षा अगोदर नेपाळ भुकंपानंतर अनेक मुली बुधवार पेठ सोडून नेपाळला निघुन गेल्या होत्या.

भारतात वेश्या व्यवसाय बेकायदेशीर आहे, परंतु दिलेल्या विशेष क्षेत्रात त्यास मर्यादा नाहीत. खाजगिरीत्या अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवला जातो, त्याला सहसा अडथळे आणले जात नाहीत. मात्र अधिकृत मंजुरीही दिली जात नाही. या भागाचे विशेष हे आहेे की, याच बुधवार पेठेमधील रस्ते दिवसा पुस्तके खरेदी करणाऱ्यांनी भरलेली दिसते. तसेच संध्याकाळ होऊ लागते तसतशी बुधवार पेठेचे रस्ते वेश्याबाजाराने गजबजुन जातात. एकदा का दिवस मावळला त्यानंतर या वेश्या महिला चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात रंगरंगोटी व ग्राहकाला आकर्षित करणारी वस्त्र परिधान करून रस्त्यावर, दारात, गॅलरीतुन वाट पाहत असतात.कधीकधी अशी वेळ असते की दिवसभर ग्राहक येत नाही म्हणून मग ते ग्राहकाला मादक इशारे करून स्वतःकडे बोलावण्याचा प्रयत्न करत असतात. इथे एकवेळ सेक्स करण्यासाठी सर्वसाधारणपणे २५० रुपये तर एक तासाचे १००० पासुन पुढे पैसे मोजावे लागतात. या भागात आलेल्या ग्राहकांना इथल्या वेश्या महिला ‘ए चिकने आता है क्या?… चलना अच्छी सर्विस दुंगी, मजा आयेगा’, अरे सून तो सही, कम पैसा देना अशा सांकेतिक शब्दांनी तर काही वेश्या मादक इशारे करुन, डोळे मारुन तर काही महिला आपल्या ब्रामधील अर्धवट स्तनांचे दर्शन देऊन त्या स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

इथल्या कुंटणखाण्यातील खोलीत प्रवेश केल्यावर सुरुवातीला एक हॉल स्वरूपातील खोली असते. त्याच्या आतमध्ये संभोगासाठी एक खाट बसेल आणि ग्राहकाला उभे राहता येईल एवढ्याच मापाच्या अनेक जागा आहेत. वेश्येला तिचे रंगरंगोटीचे सामान, कमविलेले पैसे, कंडोम व इतर साहित्य ठेवण्यासाठी छोटीशी लॉकर दिले जातात.दिवसभर ग्राहक मापक स्वरूपात असल्यामुळे त्या महिला टिव्ही सिरियल्स पाहणे, चित्रपट पाहणे, खरेदी करणे यात वेळ घालवतात. कस्टमरला त्याचा मोबाईल खोलीत सोबत घेऊन जायला परवानगी नसते तसेच त्याला काऊंटरला बसलेल्या मालकिणीकडे मोबाईल जमा करावा लागतो. तसेच ग्राहकाने निवडलेल्या वेश्या महिलेला अगोदरच ठरलेल्या दामाचे पैसे द्यावे लागतात. संभोग करून झाल्यानंतर वेश्या महिला ठराविक रक्कम त्या खोलीतील मालकीनीला द्यावी लागते.काही वेश्या बंद खोलीमध्ये गेल्यावर ग्राहकांशी गोड बोलुन जादा पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही जर नवीन ग्राहक असतील तर त्यांना संभोग न करता सुद्धा हाकलून लावण्याचे प्रकार घडतात तर काहींना संभोग पूर्ण न होताच बाहेर काढून दिले जाते.

सन २००८ मध्ये जगातील सॉफ्टवेअर कंपनीमधील नामांकित मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवार पेठतील या वसाहतीला भेट दिली होती. त्यावेळी ते अनेक वेश्यांना भेटले व सुमारे तासभर इथल्या वेश्यांसोबत ‘एच आय व्ही’ सारख्या रोगांवर त्यांनी गहन चर्चा केली.बिल गेट्स यांनी त्यांच्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फौंडेशन’ या संस्थेने वेश्यांच्या पुनरुत्थानासाठी २०० मिलीयन अमेरिकी डॉलरची मदत केली होती. वेश्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ‘सहेली संस्थे’ने सुरक्षेच्या नावाखाली केलेल्या सर्वेक्षणानुसार बुधवार पेठमध्ये ४४० कुंटणखाने असुन त्यामध्ये ७००० हुन अधिक वेश्या आहेत. सहेली संस्था वेश्यांमध्ये मासिक पाळी, सुरक्षित गर्भपात, प्रसुती, गर्भावस्था, स्तनपान, कुटुंब नियोजन याविषयी जागरुकता करते. सहेली संस्थेच्या सर्वेक्षणानुसार बुधवार पेठेतील वेश्या जुन्या लाकडी घरांतील आठ बाय सहा च्या छोट्या खोल्यांमध्ये राहतात.याठिकाणचा रस्ता पाच फूट इतका अरुंद असल्याने सायंकाळी प्रचंड प्रमाणात गर्दी होते की पाऊल ठेवता येत नाही.

बुधवार पेठेत सेक्स हा विषय गौण आहे. मात्र याच गोष्टीसाठी तिथे प्रत्येक व्यक्ती येतो असे नाही. काही जण सेक्सच्या व्यतिरिक्त ही येतात तर काही जण फक्त नवीन, दिवाळशौकीन आणि डोळ्यांनी सुख घेण्याऱ्याचा वावर याठिकाणी जास्त असतो.आजकाल हाय प्रोफेशनल वेश्या होम डिलिव्हरी, व्हाट्सअप्प, फेसबुक, ऑनलाईन एस्कॉर्ट जाहिराती, कॉल फॉर सेक्स सारख्या पद्धती वापरुन आपला व्यवसाय करतात. १९५६ च्या PITA कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी २०० मी अंतरात लैंगिक संभोग करण्यास मनाई आहे. त्यासाठी ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा आहे. तसेच १८ वर्षपेक्षा कमी वयाच्या लहान मुलीसोबत संभोग करणाऱ्यास शिक्षा व दंड होतो. जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने वेश्यावस्तीमध्ये मोफत कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या पुरवल्या जातात. जिल्हा कायदेविषयक सेवा प्राधिकरणच्या (DLSA) वतीने बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्ससाठी मोफत कायदेविषयक मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. दोन महिला वकील दररोज या केंद्रात उपस्थित असतात.

बुधवार पेठेत दोन गट झालेले आहेत.एक म्हणजे वेश्या महिला आणि दुसरे म्हणजे तृतीयपंथी. तृतीयपंथी यांचा उदरनिर्वाह ते स्वतः करताना आपल्याला पाहायला मिळतो. पण काही तृतीयपंथी हे बुधवार पेठेत देहविक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. याच देहविक्रीच्या मुद्द्यावरून तृतीयपंथी आणि वेश्यांमध्ये सतत संघर्ष, भांडणे होतात. त्यामुळे लक्ष्मी रस्तावर उजव्या बाजूला वेश्या आणि डाव्या बाजूकडील भागात तृतीयपंथीयांना जागा करून देण्यात आली आहे. तरी सुद्धा मनात वेश्याचा राग न ठेवता तृतीयपंथीयांनी “आशीर्वाद” या संस्थेच्या माध्यमातुन गेल्या दहा वर्षांपासुन बुधवार पेठेतील वेश्यांच्या मुलांसाठी बालवाडीची शाळा सुरु केली आहे. कारण वेश्याव्यवसाय करणाऱ्या वेश्या धंद्याच्या वेळी त्यांची लहान बाळं त्रास देतात म्हणुन त्यांना अफु देऊन गुंगवायच्या. पाळणाघरामुळे हे प्रकार बंद झाले आहेत. पुण्यातील वंचित विकास ट्रस्टतर्फे १९८९ पासुन “निहार” हा विशेष प्रकल्प चालवला जातो. यात वेश्येंच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालवले जाते,ज्यात बालकांचे पालनपोषण, शिक्षण, रोजगार याकडे लक्ष दिले जाते.याप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. चैतन्य महिला मंडळाच्या वतीने लैंगिक अत्याचारात बळी पडुन नाईलाजाने वेश्याव्यवसायात उतरलेल्या महिलांच्या बालकांसाठी उत्कर्ष व मोहर ही चालवली जातात. तिथे मुलांना दोन वेळ नाश्ता,दुध,रात्रीचे जेवण तसेच शिक्षण पुरवले जाते.