fbpx

स्वाभिमानी लोकनेत्याच्या कर्तृत्ववान लेकी !

राजकारण रामायण- महाभारत कालीन असो वा एकविसाव्या शतकातील, युगानुयुगे राजकारणाला षडयंत्र, छळ, कपट आणि चिखलफेकीचा शाप आहे, राजकारण कितीही गलीच्छ असले तरी या गलीच्छ आणि चिखलफेकीच्या राजकारणापासून अलीप्त असलेली चांगली माणसं, चांगले राजकारणी प्रत्येक कालखंडातील राजकारणात होते. आज एकविसाव्या शतकातील राजकारणातही आहेत. टोकाचा संघर्ष वाट्याला येऊनही रामायणात भरताने तर महाभारतात युधीष्ठिराने आपल्या चांगूलपणातून राजकारणाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला.

आज एकविसाव्या शतकात राजकारणाचा अक्षरश: चिखल झाला आहे. चिखलफेक हेच राजकारण बनले आहे. ज्याला अधिक चिखल फेकता येईल, त्याचे तितका मोठा नेता म्हणून स्वागत होत आहे मात्र, राजकारणाचा कितीही चिखल झाला असला तरी या चिखलात ‘कमळ’ आहे. मुंडे साहेबांच्या लेकी चिखलातील कमळाची भूमीका निभावत आहेत. त्यांची काम करण्याची पध्दत, संवेदनशिलता, चांगूलपण कमळाच्या पाणावर जसे पाण्याचे थेंब मोत्या सारखे चमकतात तसे मुंडे साहेबांच्या लेकींची नितिमत्ता, चांगुलपणा आणि कर्तृत्व राजकीय चिखलातील कमळावर हिऱ्या- मोत्या प्रमाणे चकाकत आहे.

panakaja
राज्याच्या ग्रामविकामंत्री पंकजाताई या एखादावेळ कोणाचा विवाह सोहळा, कोणाच्या उद्घाटन समारंभाला कदाचित उपस्थित राहील्या नसतील. मात्र महिला, मुली, विद्यार्थी यांचे मार्गदर्शन शिबीर, मेळावा अशा कार्यक्रमाला त्या अवर्जून उपस्थित राहातात. वेळ प्रसंगी व्यस्त कार्यक्रम असल्यास हेलीकॉप्टरने येतात. मुलांना प्रेरणा देतात,यशस्वी होण्यासाठी विचारांची उर्जा देतात. अनाथ, वंचित, उपेक्षीत मुले, महीला यांच्यात मिसळतात. त्यांच्या सोबत शेल्फी घेतात,एखादे अनाथालय, दिव्यांगांच्या विद्यालयात जावून आपला वाढदिवस साजरा करतात. चिमुकल्या अनाथ मुलांना कडेवर घेतात, उमा क्षीरसागर (जालना) सारखी गरीब शेतकऱ्याची मुलगी जेव्हा थकलेल्या मायबापांचा आधार बनते तेव्हा तीच्या प्रेरणादायी संघर्षाची स्वत: व्हिडीओ क्लिप तयार करून महिला मुलींना प्रेरणा देतात. मुली-महिलांसाठी 5 रुपयात सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना राबवतात, मंत्रीमंडळात प्रतिष्ठा पणाला लावून अनाथ मुलांना आरक्षण देतात. वाड्या-वस्त्या आणि तांड्यावर राहणाऱ्या गोरगरीबांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी राज्यातले सर्वात मोठे महाआरोग्य शिबीर घेतात. ही संवेदशीलता हेच चिखलातील कमळावरचे चकाकणारे मोती आहेत.

सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचे देशात 543 एवढे सदस्य आहेत. या पैकी किती खासदारांनी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्तीसाठी फंड दिला आहे? विशिष्ट टक्केवारी घेऊन फंड विकणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. तथ्य आहे की नाही माहित नाही मात्र वीस- वीस टक्के घेऊन फंड विकल्याच्या सुरस कथा ऐकायला मिळतात. एकीकडे ही परिस्थिती असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांचा विचार करून शाळा दुरूस्तीसाठी कोट्यावधीचा फंड देणाऱ्या प्रीतमताई मुंडे ह्या देशातील एकमेव खासदार आहेत. खासदार फंड मिळाला नाही म्हणून कार्यकर्ते नाराज झाले तरी चालतील मात्र चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे छत सुरक्षीत असले पाहीजे ही भूमीका आणि विचार मुंडे साहेबांच्या लेकीच करू शकतात. म्हणूनच त्या राजकारणाच्या चिखलातील कमळ आहेत.

pankaja mundeमागील सरकारच्या पंधरा वर्षाच्या सत्तेत कागदोपत्री खूूप कामे झाली असतील मात्र प्रत्यक्षात बहीरवक्र भींगातून पाहीले तरी कुठे विकास दिसत नाही. राजकारणाच्या चिखलातील कमळ बनून नितीमत्तेच्या राजकारणाला प्रमाणिक प्रयत्नांची जोड देणाऱ्या  मुंडे साहेबांच्या लेकींनी रेल्वे, रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, पुल, पासपोर्ट कार्यालय, पिकविमा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ईमारती, जलयुक्त शिवार योजना ही ठळक दिसणारी विकासकामे अवघ्या साडेतीन- चार वर्षाच्या सत्तेत केली आहेत. राजकारणाच्या चिखलातील एकमेव असलेल्या कमळावर शिंतोडे उडवण्याचे काम सातत्याने सुरू असले तरी या कमळावर चांगुलपणा आणि कर्तृत्वाचे हीरे मोतीच चमकताना दिसतात. हाच लोकनेते मुंडे साहेबांचा वारसा आहे. हा वारसा घेऊन काम करताना कमळावरचे चमकणारे हिरे, मोती कधीच खाली निखळून पडणार नाहीत. असा विश्वास वाटतो…! माजी पंतप्रदान अटल बिहारी वाजपेयी यांच्या.”आओ फिर से दिया जलाए” या कवितेतील चार ओळी आठवतात…

आहुति बाकी यज्ञ अधूरा,अपनों के विघ्नों ने घेरा है।

अंतिम जय का वज़्र बनाने नव दधीचि हड्डियां गलाएँ। आओ फिर से दिया जलाएँ !!

उद्याच्या भविष्यासाठी, नव समाज निर्मितीसाठी, राजकारणातील नीतिमत्ता आणि पारदर्शकतेसाठी, डोळ्याने दिसणाऱ्या विकासासाठी. तुफानात मिन- मिनणारी, उजेड देण्यासाठी संघर्ष करणारी पणती कायम तेवत राहणे गरजेचे आहे…!!!
– बालाजी तोंडे