ताई प्रश्न तुमच्या आमदारकीचा नाही, मुंडे साहेबांच्या स्वाभिमानाचा आहे; आता निर्णय घ्याच…

pankaja-munde

एक उच्चशिक्षित मुंडे सैनिक 

पुणे : चला पुन्हा संघर्षाच्या पेटवू मशाली ! संघर्ष ,संघर्ष आणि पुन्हा संघर्ष करण्यासाठीच देवाने मुंडे परिवार आणि त्यांच्या अनुयायांना या जगात जन्म दिला आहे असे वाटण्यासारखी आजची परिस्थिती आहे. आपल्या नशिबी जन्मापासून पोटासाठी संघर्ष, जगलोत तर समाजामध्ये अस्तित्व निर्माण करण्यासाठी ,आपली ओळख पटवून देण्यासाठी संघर्ष,समाजाने ओळख दिल्यावर आपल्या अधिकारासाठी संघर्ष, त्यानंतर समाजाचे नेतृत्व करण्यासाठी तर प्रचंड संघर्ष,नेतृत्व मान्य करून पद मिळण्यासाठी पुन्हा संघर्ष,आणि पद मिळाल्यावर असे वाटले की आपला संघर्ष संपला. आपले जीवन सार्थकी लागले,केल्याल्या संघर्षाचे चीज झाले परंतु ईश्वराला हे मान्य नव्हते आणि रात्रीतून एवढ्या संघर्षातून मिळालेले नेतृत्व आणि पद दोन्ही आपल्यापासून हिरावून घेतले. समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आणि ईश्वराने पुन्हा या गरीब दीन दुबळ्या समाजाला संघर्ष आणि अंधकाराच्या खायीत लोटून दिले.

परंतु या ही परिस्थितीत समाज सावरला ,नेतृत्व सावरलं, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली "असे म्हणून पुन्हा समाज आणि नेतृत्व संघर्षासाठी उभे राहिले. समाजाने पंकजाताईंचे नेतृत्व मान्य करून त्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले ,बळकटी दिली. या संघर्षाच्या जोरावर पुन्हा महाराष्ट्रात सत्तांतर झाले, या मध्ये आपले योगदान मोठे. पण त्या योगदानाचे ना कोणी कौतुक केले ना कोणी ते मान्य केले. इथेही आपल्या नशीबी संघर्षच !!

मी पक्षासाठी काम करत होतो तेव्हा आताचे नेते चड्डीत मुतत होते : एकनाथ खडसे

पद दिले ते टिकवण्यासाठी मोठा संघर्ष, शह काटशहाचे,राजकारण केले गेले. आपल्या विरोधी शक्तींना पाचही वर्षे बळ दिले गेले आणि याचा परिणाम परळीतील पराभवात झाला. इथपर्यंत ठीक होते पण त्यानंतर ही राजकारण थांबायला तयार नाही. जणू काही मुंडे साहेबांचे पूर्ण नाव नामशेष करायचंच, त्यांचा गट नाही तर अस्तित्वच नेस्तनाबूत करायचं ,त्यांची जवळची माणसं फोडायची या उद्देशाने पुढे सगळे काही घडत आहे. आंबेडकरी चळवळीसारखे मुंडेसाहेबांच्या माधवचे दहा तुकडे करुन वापरायचे.

ताई खूप संयमाने आणि परिपक्वततेने हि परिस्थिती हाताळत आहेत, राजकारणात संयम आवश्यक आहे. परंतू तो एवढा पण नसावा की या संयमात कोणी आपले अस्तित्व नष्ट करून टाकेल. ताईंचे नेतृत्व एक आमदारकी न मिळाल्याने संपणारे नाही, हा प्रश्न ताईंच्या आमदारकीचा किवा त्यांच्या नेतृत्वा पुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे मुंडे साहेबावर प्रेम करणाऱ्या कोट्यवधी गरीब, दीन दुबळ्या लोकांच्या स्वाभिमानाचा, हा प्रश्न आहे दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या अस्मितेचा, हा प्रश्न आहे मुंडे साहेब, ताई साहेब यांचे नेतृत्व मानणाऱ्या नेते, कार्यकर्ते आणि तरुणांचा. हा प्रश्न आहे समाजातील वंजारी, माळी साळी कोळी ,धनगर ,लमान ,दलित, मुसलमान आणि बहुजन यांच्या नेतृत्वाचा. आज तुम्हाला आमदारकी मिळाली नाही म्हणजे प्रत्येकाला वाटते आहे आपल्याला काही मिळालं नाही व आपली -समाजाची ही हार आहे.

तळीरामांची चांदी : आता सरकार देणार घरपोच दारू

समाजाने आजवर आपले नेतृत्व सांभाळले त्याला बळ दिले आणि हे नेतृत्व नष्ट करण्याचे पाप काही नतभ्रश्ट लोक आणि तेही आपलेच लोक करत असतील तर या समाजाने ,समाजाच्या नेतृत्वाने विचार करण्याची वेळ आलेली आहे की या पक्षात आपल्याला भविष्य काय आहे? हि जी मंडळी आहे किंवा हा जो पक्ष आहे जो उभारण्यामधे मुंडेसाहेब यांनी आपले आयुष्य खर्ची घातले ती माणसं, तो पक्ष वाढवायचा की फोडायचा? ताई मला राजकारणातले जास्त कळत नाही पण मला वाटते हीच ती वेळ आहे.

आपण तरुण आहात, पंधरा-सतरा वर्षे सक्रीय आहात. हा आपला सगळ्यात प्लस पॉइंट आहे. आपण पुढच्या२० वर्षाच्या राजकारणाचा विचार करून ,आपल्या अनुयायांचा विचार करून आपल्या समाजाचा , आपल्याला नेता मानणाऱ्या असंख्य नेते कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. तुम्ही या सगळ्यांचा विचार करतच असाल परंतु वेळ महत्त्वाची आहे. जर आपल्याला भाजप मध्येच राहायचे असेल तर समाजाला भाजप आता तेवढा आपला वाटत नाही जेवढा तो पूर्वी वाटायचा. चार दोन मुकादमांना पदं देऊन समाजाच्या टोळ्या पडणार नाहीत.

भाजप बद्दलचे समाजाचे प्रेम साहेब गेले तेंव्हाच कमी झाले आहे ,तुमच्यामुळे अजून हा समाज या पक्षासोबत आहे. पण पक्षाची तुमच्याबद्दल भूमिका पाहून समाज अजूनच या पक्षापासून दूर जात आहे आणि तोही मनाने दूर जात आहे . एकदा समाजाच्या मनातून पक्ष उतरला तर पुन्हा जोडण्यासाठी खूप वेळ लागतो साहेबांना चाळीस वर्षे लागली.

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा : अमोल कोल्हे

समाज तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहे.तुम्ही जर याच पक्षात राहण्याचा निर्णय घेतला तर कुणी नाराज होणार नाहीत परंतु समाजातील अनेक घटक म्हणतात की एखाद्या राष्ट्रीय पक्षात आपल्याला चांगले भविष्य असू शकते .आपल्याला भविष्य कुठे आहे हे आमच्या पेक्षा तुम्हाला त्याची जास्त जाण व माहिती आहे या सगळ्याचा विचार करून निर्णय तुम्ही घ्यायचा आहे .तुमचा निर्णय सगळ्यांना मान्य असेल.एव्हाना तुमचा निर्णय झालेला पण असेल परंतू आपला पुढील काळ खूप महत्त्वाचा आहे .सर्वांना वाटत आहे की आता पंकजाताईचे पुढे काय होणार?

अनेक राजकीय पंडित आपापले मत मांडत आहेत. या सर्वांना आपल्या कामातून उत्तरं द्यावे लागेल.हे करोनाचे संकट संपल्या बरोबर तुम्हाला पायाला भिंगरी लाऊन महाराष्ट्र पिंजून काढवा लागेल.

संघटन बांधा, वाडी वस्त्यांवर जा,लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनमानसाचा असा सेलाब तयार करा की पक्ष ,नेते तुमच्या मागे हे पद घ्या म्हणून मागे लागतील. तुमच्यासाठी हे नवीन काहीच नाही, राजकारणात आल्यापासून तुम्ही हेच करत आहात ,साहेबांनी हेच केले ,आपली खरी शक्ती लोकसंग्रह आहे आणि तो आपल्याकडे कमी नाही,संघर्ष आपल्या रक्तात आहे ,फक्त त्याची व्याप्ती वाढवा.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बहुजन समाजातील विचारवंतांचा थिंक टांक बनवा ,त्यांच्या सूचनांचा उपयोग करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं प्रत्येक विभागवार किंवा जिल्हानिहाय जनसंपर्क कार्यालय उभे करा ,प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एका व्यक्तीची नेमणूक करा ज्याला भेटले म्हणजे ते काम तुमच्यापर्यंत पोचले असा लोकांना विश्वास येईल,प्रत्येक ठिकाणी जबाबदारीची वाटणी करा ,अधूनमधून विचारवंतांची बैठक घेऊन समाजमन काय आहे हे जाणून घ्या, तुमच्या पर्यंत लोकांचे पोहचणे सुसह्य करा. आपण महिला आहात तुमच्या काही मर्यादा आहेत हे आम्ही जाणतो पण या वर तुम्ही तशी यंत्रणा उभी करून मात करू शकता तुमच्या आजूबाजूची गर्दी कमी होइल त्यामुळे तुम्ही अजून जास्त काम करू शकाल. आपल्या पक्षातील झारीतील शुक्राचार्य ना आपल्या लोकसंग्रहाने उत्तरं द्या ,आणि त्यांना दाखवून द्या हे रक्त मुंडे साहेबांचे आहे ,तुमच्या शह काटशाच्या राजकारणाला घाबरणारे नाही, तुमच्या कुरघोडीच्या राजकारणाला घाबरणारे नाही तुम्हाला आम्ही पुरून उरू व आमचा अधिकार आम्ही संघर्षातून मिळवू.त्यांना दाखवून द्या आम्ही देणारे आहोत मागणारे नाही.

तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या, धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद